Subscribe Us

header ads

कुंटणखाणयावर पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकाची कारवाई.


बीड-: शहरातील पालवणचौक येथे नाथ नगर भागातील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखाणयावर पोलीस अधीक्षक आर. राजा यांचे विशेष पथक आणि एलसीबी च्या पथकाने छापा मारून दोन पीडित महिलांची सुटका केली.यावेळी त्या पिडीता कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या ऑंटीला अटक करण्यात आले.  ही कारवाई सोमवारी  (9 ऑगस्ट)  दुपारी करण्यात आली. 
नाथ नगर येथील शंकुतला सुरेश राऊत ही महिला तिच्या घरातून कुंटणखाणा चालवत असून परिसरातील काही पीडीत महिला कडून ती जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती.त्याआधारे पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळा रचला
आणि डमी ग्राहक पाठवून शकुंतला शी संपर्क साधला असता त्यांनी दोन महिला उपलब्ध असल्याचे सांगितले. सोमवारी दुपारी 4:30  च्या सुमारास
पोलिसांनी  दोन डमी जवळ रक्कम देऊन शकुंतलाच्या घरी पाठवले.खोलीत जाताना डमी ग्राहक इशारा करताच पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि दोन खोल्यातून दोन पीडितांना ताब्यात घेतले. शकुंतला राऊत आमच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असून मिळणाऱ्या रकमेतून अर्धी रक्कम ती ठेवून घेत होती. अशी माहिती पीडितांनी दिली. पोलिसांनी ऑंटी शकुंतला सुरेश राऊत
याला ताब्यात घेतले.तिच्याघराची झडती घेत रोख रक्कम,  मोबाईल असा एकूण 7  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व दोन्ही पीडितांची सुटका केली.  याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून ऑंटी शकुंतला राऊत वर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा एलसीबीचे पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पीएसआय भारती, पोलीस कर्मचारी वाळके, उगले, बहिरवाळ, खटाणे,व नेवडे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा