Subscribe Us

header ads

मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा - सलीम जहाँगीर


मोहरमच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गंभीर चूक ; राज्य सरकारने माफी मागावी



बीड ( प्रतिनिधी ) मोहरमच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये गंभीर चूक करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. राज्यसरकारने तातडीने माफी मागावी आणि सूचना परिपत्रकात बदल करावा अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने  दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजीच्या परिपत्रकात मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड - 19 च्या अनुषंगाने या सूचना जारी करण्यात आल्या असल्या तरी सदर परिपत्रकात मोहरम महिन्यातील 9 व्या रात्रीचा उल्लेख ' शहादत की रात ' ऐवजी ' कत्ल की रात ' असा उल्लेख करून समस्त इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. ही चूक अतीशय गंभीर असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह ज्यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आला आहे ते उपसचिव संजय खेडेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाची माफी मागून त्यात तातडीने दुरुस्ती करून नवीन परिपत्रक काढावे अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा