Subscribe Us

header ads

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या नंतर मामाला पाठवला मेसेज.

मुंबई-: नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० जुलै रोजी ऐरोलीत ही घटना घडली. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलीने आईची हत्या केल्याचं समोर आले  आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पीडित ४१ वर्षीय महिला वारंवार मुलीच्या मागे लागली होती. यामुळे दोघींमध्ये जोराचं भांडण झालं होते. ही घटना ३० जुलै रोजी घडली असली तरी गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुलीने आई विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावले होतं.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार. मुलीने नीट परीक्षेसाठी तयारी करावी यासाठी महिला तिच्या मागे लागली होती. मुलीने डॉक्टर व्हावे  अशी त्यांची इच्छा होती.
३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरुन दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. मुलीने आईला धक्का दिल्या, ज्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवला आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरुन मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले. पण आता माघार घेत असं तिने मेसेजमध्ये लिहिले  होते.अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे.
शवविच्छेदन केले असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले  महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेतले असता तिने हत्येची कबुली दिली आहे. असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा