Subscribe Us

header ads

बावची गावाला मिळाले कृषिदूत (अभिषेक क्षीरसागर यांचे लाभले मार्गदर्शन ) डॉ शहाजी चंदनशिवे

(प्रतिनिधी परंडा) दि . 9 ऑगस्ट 2021  बीड येथील सौ के एस के काकू कृषी महाविद्यालय बीड यांच्या अंतर्गत कृषी दूत परंडा येथील  क्षिरसागर अभिषेक बाबासाहेब यांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राची माहिती दिली .  त्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्याचे फायदे ,बोर्डो पेस्ट  करण्याची   प्रक्रिया, बीज उगवण क्षमता चाचणी, शेतीसाठी वापरात असणारे विविध ॲप एकत्रित कीटक रोग व्यवस्थापन, वृक्ष लागवड, बँकेच्या विविध योजना, माती परीक्षण यासारखे  प्रात्यक्षिक  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवत आहेत .  त्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस शिंदे, डॉ एस एस चव्हाण,  डॉ एस पी मोरे, प्रा बी पी मांजरे ,डॉ एसटी शिंदे प्रा बीपी तांबोळकर, प्रा एस वि राठोड, प्रा बिडी बामणे, प्रा एस एस राठोड, प्रा बी डी तायडे ,प्रा डी एस जाधव, प्रा बीआर चादर,   व प्रा एस पी शिंदे  यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले .  कृषिदूताने  दिलेल्या माहितीबद्दल  शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा