Subscribe Us

header ads

अनेकांच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत योगप्राणायम शिबीर संपन्न , याेग मार्गदर्शिका पुस्तकांचे वितरण


चंद्रपुर- विदर्भ - रुतुजा साेनवाने - चंद्रपूर शहरात योग प्राणायाम शिबीराचे आयाेजन काल रविवार दि. 08 ऑगष्टला सकाळी 08,30 वाजता करण्यांत आले . पतंजली योग समिती चंद्रपुरचे जिल्हाध्यक्ष भगवानजी पालकर, महानगर पालिकाचे उपाध्यक्ष तथा आयोजक राहुलजी पावडे,जिल्हा भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष विजयजी चंदावार,जिल्हा पतंजली योग समितीचे महामंत्री अशोक संगिडवार,जिल्हा संघटन मंत्री शरद व्यास,जिल्हा उपाध्यक्ष  रमेश ददगाल,जिल्हा कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभय्ये,जिल्हा युवा अध्यक्ष संजीव व्यास,तालुका पदाधिकारी  सुधाकर शिरपूरकर,महिला समितीच्या योग विस्तारक महिला कार्यकर्त्या त्याचप्रमाणे संघटनचे पदाधिकारी उपस्थित होते  डॉ.दास , सोनी,विकास गहुकर, गुजराथी भवनचे अध्यक्ष,मुर्लिधर शिरभये ,सुवर्णा लोखंडे ,संतोषवार व असंख्य याेग प्रेमी माेठ्या संख्येंने उपस्थित होते. प्रारंभी नवनियुक्त शिक्षक-शिक्षिकांनी प्राणायाम करुन घेतले .त्यानंतर उपमहापाैर  राहुल पावडे यांचे हस्ते योग मार्गदर्शीका पुस्तकाचे वितरण करण्यात आले.  भगवानजी पालकर, राजकुमार पाठक , विजय चंदावार,शरद  व्यास यांनी उपस्थितीतांना  मार्गदर्शन केले. पाचही संघटन मिळुन स्वामीजीच्या कार्यास हातभार लावत मतभेद दूर करुन योग गंगेचा प्रवाह अधिक वाढविला पाहिजे असा अमुल्य संदेश या वेळी दिला.  महिला पतंजलीच्या सदस्या वैजयंती गहुकर यांनी सुरेख  योगनृत्य सादर केले. राहुलजी पावडे यांनी सोमवार दि. 9 ऑगस्ट 2021 पासुन शहरातील चाफले लॉन येथे नित्य सकाळी 06,30 ते 08,00 वाजे पर्यंत योगवर्ग घेतल्या जाईल. असे सांगितले .अल्पोहारानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा