Subscribe Us

header ads

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अल्पसंख्याक प्रतिनिधीची तातडीने नियुक्ती करा - सलीम जहाँगीर


मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ; चार सदस्यीय समितीत स्थान न मिळाल्याची तक्रार



बीड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र लोकसेवा आयोग                सदस्यपदी चार सदस्य निवडीसाठी पात्र अधिकारी वर्गाकडुन अर्ज मागवण्यात आले होते. 4 सदस्य निवडीसाठी 7 लोकांची निवडसमिती शिफारस  केली आहे. 4 जागांसाठी  4 जणांचे नावे राज्यपाल यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते.या 4 नावामध्ये अल्पसंख्याक ,मुस्लिम समाजातील व्यक्तिचे नामनिर्देशन होणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने केवळ तीनच नावे मंजुरीसाठी पाठवून अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला आहे. यासंदर्भात तातडीने अल्पसंख्याक व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  अल्पसंख्याक व्यक्तिव्यतिरिक्त  इतर केवळ 3 नावे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांना कळवण्यात आली होती व त्याअनुषंगाने ही सदस्ययादी मंजुर झाली. याठिकाणी अल्पसंख्याक मुस्लीम समाजास वंचित ठेवण्यात आले. या प्रक्रियेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारकडून मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाबाबत आम्ही अल्पसंख्याक सामाजिक संस्था ,राजकिय प्रतिनिधी मार्फत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य नियुक्तीसाठी अल्पसंख्याक व्यक्तींची नियूक्ती होणे कामी पूरवणी प्रस्ताव राज्यपाल यांचेकडे पाठवुन मंजुरी मिळवणे हाच या झालेल्या अन्यायाबाबत न्याय देण्याचा मार्ग आहे. यासंदर्भात  मुख्यमंत्री यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्यपदी अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधीची नियुक्ती  होण्याकरिता त्वरीत सकारात्मक कार्यवाही करावी. अन्यथा याबाबतीत अल्पसंख्याक मुस्लीम समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सनदशिर मार्गाने आंदोलन करावे लागेल. याची मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा