Subscribe Us

header ads

बिंदुसरा नदी बचाव आंदोलन;नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम, भुमाफियांवर गुन्हे दाखल करा,मोमीनपुरा-खासबाग जोडणारा पुल तात्काळ बांधण्यात यावा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बीड-: बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम, कचरा टाकणे, नदीकाठावरील अतिक्रमण तसेच ब्राम्हणवाडी ते मंन्सुरशाह दर्गाह शासकीय ओढ्यातील बांधकाम अतिक्रमण धारक व त्यांना पाठींबा देणारे नगरपरिषद व भुमिअभिलेख कार्यालयातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच मोमीनपुरा-खासबाग जोडणा-या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलासाठी निधी उपलब्ध करून पुल बांधण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर,  मुक्त पत्रकार एम. एस.युसुफ तसेच सामाजिक कार्यकर्ते सय्यद ईलियास दिलावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत .


बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील रेडझोन व पुरग्रस्त भागातील अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबवुन संबधित प्रकरणातील जबाबदार नगरपरिषद, भुमिअभिलेख, बिल्डरवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ब्राम्हणवाडी-मंन्सुरशाह शासकीय ओढ्यातील बांधकाम अतिक्रमण धारक तसेच त्यांना पाठींबा देणारे नगरपरिषद व भुमिअभिलेख कार्यालयातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, नदीपात्रात कचरा टाकुन नदीचे पात्र प्रदुषित करून बीड नगरवासियांच्या आरोग्यास धोका निर्माण नगरपरिषद मुख्याधिकारी, आधिकारी-कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, भविष्यात जर पुरजन्य परिस्थिती उद्भवुन वित्त व जिवित हानी झाली तर नगरपरिषद मुख्याधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी. बेकायदेशीर प्लाॅटींग गुंठे खरेदी-विक्री संदर्भात नगरपरिषदेचा ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा.  तसेच मोमीनपुरा-खासबाग जोडणा-या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून पुल बांधण्यात यावा. तसेच बीड शहरातील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आली नसताना नगरपरिषदेच्या संकेत स्थळावर महिलांसाठी 25 स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली असल्याचे खोटेच प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येऊन ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त रद्द करण्यात यावे. आदि. मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, 
यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.8180927572

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा