Subscribe Us

header ads

नगर पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे आरोग्य व्यवस्था ढेपाळली -राजु झोडेंचा आराेप


 

बल्लारपूर: रुतुजा साेनवाने - बल्लारपूर शहरात डेंगू मलेरिया चे थैमान सुरु असून रुग्णालयात पेशंटच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे कित्येक रुग्णांचे जीवसुद्धा जात आहेत. तरीही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करून गाढ झोपेचे सोंग करत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी आज  केला.
       बल्लारपूर शहरात जीवन प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामामुळे शहरात जागोजागी खड्डे पडलेले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण तयार झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून नगरपालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. नगरपालिकेच्या दुर्लक्ष पणामुळे नागरिकांचे डेंगू मलेरियाने प्रचंड हाल होत असून यावर प्रभावी उपाययोजना नगरपालिकेने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी द्वारा करण्यात आली.
     नगरपालिका, बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तिघांनी मिळून बल्लारपूर शहरातील सुंदर रस्ते फोडून पाईपलाईनचे काम केले. काम केल्यानंतर जसेच्या तसे रस्त्यावरील खड्डे ठेवल्यामुळे सांडपाण्याचा विचरा होत नाही. त्यामुळेच शहरभर घाणीचे साम्राज्य वाढले आहे. याला जबाबदार नगरपालिका प्रशासन असून कुचकामी नगराध्यक्ष फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. यावर तात्काळ उपाययोजना करुन लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवून सांडपाण्याचा विल्हेवाट लावावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी याविरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला.
   नगर प्रशासनाला निवेदन देताना वंचितचे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, जाकीर खान, स्नेहल साखरे, गुरु कामटे, भास्कर कांबळे,प्रदीप झामरे, निरज शेंडे , वंचितचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा