Subscribe Us

header ads

पुण्यात निर्बंध शिथिल अजित पवारांच्या बैठकीनंतर निर्णय!

पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय!



पुणे-: साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यात ६५ लाख २५ हजार ५८० नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार असून जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार असा इशारा पुणेकरांना दिला असून मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं अधोरेखित केलं आहे. १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. “सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचं पालन केलंच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे. मुभा देत असताना करोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंतवड ३.५ आणि ग्रामीणचं ५.५ आहे. ग्रामीणचा नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा