Subscribe Us

header ads

ज्योतिराम घुले सारखे जिद्दी खेळाडू आमच्या बीड जिल्ह्याची शान - ना. धनंजय मुंडे


बांग्लादेश विरुद्धच्या सामान्यांसाठी ना. मुंडेंनी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाला दिल्या शुभेच्छा; मॅच पाहायला येण्याचा देखील दिला शब्द



परळी (दि. 29) ---- : आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर ऊसतोड कामगार कुटुंबातील एक तरुण भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार होतो, ही अत्यंत अभिमानाची बाब असून ज्योतिराम सारखे खेळाडू आमच्या बीड जिल्ह्याची शान आहेत, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघाचे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बांगलादेश विरुद्ध कसोटी व एकदिवसीय सामने होत आहेत. या सामन्यांच्या पूर्वसरावासाठी ज्योतिराम व सहकारी जाणार आहेत, तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांची त्याने सदिच्छा भेट घेतली. यावेळी ना. मुंडे यांनी ज्योतिराम घुले व सर्व टीमला बांगलादेश सोबत होणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मॅचला स्वतः पाहायला येणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान केज तालुक्यातील डोनगाव येथील सामान्य ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्योतिराम हा तरुण, शालेय शिक्षणापासूनच खेळाची त्याची आवड त्याने जोपासली. क्रिकेट बरोबरच धनुर्विद्येत देखील ज्योतिरामचे नावलौकिक केलेला आहे. दरम्यान 2018-19 साली ज्योतिराम घुले याने प्रथम भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याचे भेटून अभिनंदन केले होते. खडतर परिस्थितीवर मात करत ज्योतिरामने मिळवलेले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा