Subscribe Us

header ads

नगर रोड बालेपीर अमराई येथील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जगणे दुर्लभ झाले- सय्यद सादेक शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड



बालेपीर अमराई येथील गल्यामधील रस्त्याचे काम अर्धवट सोडलेले कामे नगरपालिकेने मार्गी लावावे अन्यथा येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी मोठे जनआंदोलन उभा करेल- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप 


 बीड प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

(बीड प्रतिनिधी) बीड नगर रोड बालेपीर अमराई या भागामध्ये आज रविवार रोजी आम आदमी पार्टीचे दर आठवड्याला होत असलेले स्वच्छता अभियाना मध्ये  येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासन  जनप्रतिनिधी यांच्याविरोधात रोष व्यक्त करण्याचं काम आज केले या भागांमध्ये अटल जल योजनेच्या नावाखाली नळाची पाईपलाईन खोदण्यात आली दिले गेले परंतु त्या नळाला पाणी सोडण्यात येत नाही तेथील रस्ते खानुं ठेवले गेले परंतु सिमेंट काँक्रिटचे रस्ते खाल्ले असताना त्यामध्ये डबल काँक्रेट करून दिले गेलेले नाही ते खड्डे तसेच ठेवण्यात आले याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही नगरपालिका मागील चाळीस वर्षापासून एकाच घराण्याची एक हाती सत्ता असून सुद्धा  येथील नागरिकांची त्यांना साथ देऊन देखील त्यांना विकासापासून दूर ठेवण्याचे पाप येथील जनप्रतिनिधी करत आहेत आणि हा रोष आम आदमी पार्टीच्या स्वच्छता अभियाना मध्यें नागरिक व्यक्त करत होते आम आदमी पार्टी जेव्हापासून शहरांमधील विविध प्रश्नावर उतरत आहे नागरिकांच्या समोर जात आहे नागरिक आपले प्रश्न आमच्या समोर मांडून सोडवण्यासाठी आमच्या सोबत उभा राहत आहेत परंतु हे सगळं पाहून देखील नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे होतं त्याप्रकारे नगरपालिका काम करताना दिसत नाही या भागातील रस्ते फुटलेल्या नळाच्या पाईपलाईन बंद पडलेल्या नाल्या येथील लाईटचे मध्यभागी आलेले खांब या सर्व प्रश्नांना नगरपालिका नजर अंदाज करत आहे हे सगळे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी लवकरच येथील नागरिकांना घेऊन नगरपालिकेला निवेदन देणार आहे जर लवकरात लवकर काम नाही झाली तर आम आदमी पार्टी आपल्या स्टाईलमध्ये जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत सर्व नागरिकां सोबत ठिय्या आंदोलन घेऊन बसणार या अभियानामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री रामधन जमाले सचिव सय्यद सादिक शहर प्रमुख रामभाऊ शेरकर अभिषेक टाळके व तेथील समस्त नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा