Subscribe Us

header ads

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला एलसीबीने केला अटक

बीड-:स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी बीड शहरात पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांना गुप्त बातमी मिळाली होती कि, रॉयल ज्युस बार अॅक्सीस बँक समोर अक्षय लाड नावाचा इसम उभा असून तो विनापरवाना बेकायदेशीररित्या त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावून थांबलेला आहे, अशी माहिती मिळताच सापळा लावून इसमास ताब्यात घेतले आहे. 
त्याचे नाव अक्षय व्यंकटराव लाड वय 22 वर्षे रा.माळीवेस कोतवाल गल्ली बीड असे आहे. त्याच्याकडून पिस्टल व राऊंड असे एकूण (50500) -रुपयाचा मुदेमाल जप्त करुन त्यास पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे हजर करुन गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा