Subscribe Us

header ads

राज्यात दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण देशात महाराष्ट्र आघाडीवर राज्यातील तब्बल एक कोटी ५३ लाख ७८ हजार ४५० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले.

मुंबई-:महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज्यातील तब्बल एक कोटी ५३ लाख ७८ हजार ४५० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तर शुक्रवारी (२८ ऑगस्ट) एका दिवसात विक्रमी नोंद करत राज्यात सुमारे १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी आरोग्य यंत्रणेचं कौतुक करताना म्हटले आहे कि, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच प्रशंसनीय आहेत. त्याचप्रमाणे, राज्यात दर दिवशी १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं देखील लसीकरण केले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांच्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देण्यात आली होती राज्याने २१ ऑगस्ट रोजी हा विक्रम मोडून काढत ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी केली. तर, शुक्रवारी (२७ ऑगस्ट) राज्यात ९ लाख ९० हजार इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा