Subscribe Us

header ads

शहरातील विविध समस्यावर आ.सुरेश धस यांना लोकसेनाने दिले निवेदन-शेख अयाज़

बीड (प्रतिनिधि)- स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. मा. सुरेश अण्णा धस हे बीड नगर परिषदेला मार्गदर्शन व कामाकाजाचा आढ़ावा घेण्याकरिता आले असता लोकसेना संघटनेचे बीड शहराध्यक्ष शेख अयाज़ अख्तर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून बीड मधील वार्ड क्र. 21 सह शहरातील विविध नागरी समस्यावर निवेदन देवून चर्चा केली.
सविस्तर असे की स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. मा. सुरेश अण्णा धस हे बीड नगर परिषदेला मार्गदर्शन व कामाकाजाचा आढ़ावा बैठक घेण्याकरिता आले असता लोकसेना संघटनेचे बीड शहराध्यक्ष शेख अयाज़ अख्तर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून वार्ड क्र. 21 मधील नागरी समस्याबद्दल निवेदन दिले या निवेदनामध्ये असे सांगितले की नगर सेवक व नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या वार्डात एवढे हाल झाले रस्ते मागच्या निवडणुकीत बनवन्याच्या आश्वासनावर मुरुम टाकण्यात आले होते आता पण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुरुम टाकण्यात येत आहे रस्ते कधी बनवणार आम्ही शहराबाहेरचे असल्यासारखी वागणुक नगरपालिका देत आहे वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या असून नागरिक अनेक समस्यापासून त्रस्त आहे तीच परिस्थिति शहराची आहे शहरात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहे, स्ट्रीट लाईट बंद असल्याने शहरात अंधार आहे, अनेक ठिकाणी पिण्याचे पाण्याची समस्या आहे हे अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्यात यावे नस्ता लोकसेना संघटना नगर परिषदे विरोधात आंदोलन करणार असा इशारा लोकसेना संघटना बीड शहराध्यक्ष शेख अयाज़ अख्तर यांनी या निवेदनाच्या माध्यमाने दिला निवेदन देताना शेख अयाज़  मोमिन इमाम शेख अनिस सय्यद समीर इकबाल खान समीर खान शेख आमेर शेख इरफान शेख सोनू तसेच वार्डोतील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा