Subscribe Us

header ads

शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर भर रस्त्यावर प्राणघातक हल्ला!

बीड-:शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड- परळी महामार्गावरील घोडका राजुरी परिसरात हा हल्ला झाला आहे. हल्यात जखमी झालेले जगताप यांच्यावर बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या ८ दिवसापासून शिवसेना मधील अंतर्गत वाद थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर व्यक्त झाली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख पैसे कमावण्याच्या नादात पक्षाकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार देखील उपजिल्हाप्रमुख यांनी केली होती. या नंतर हा प्रकार घडल्याने पुन्हा शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.
२ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधाऱ्यांविषयी तक्रार केली होती. त्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे, असे जखमी हनुमान जगताप यांनी म्हटले आहे. राजकीय द्वेषापोटी माझ्या पतीला मारहाण केली आहे, असे जगताप यांच्या पत्नीने म्हंटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
या विषयी जखमी हनुमान जगताप म्हणाले, की २ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधार्यां विषयी तक्रार केली होती. आणि त्याच्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे.
असा संशय जखमी हनुमान जगताप यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेले आणि भांडण सोडणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार सांगितले आहे. यामध्ये मारहाण  करणाऱ्याच्या हातात तलवार होती, असे देखील घटनास्थळी उपस्थित असलेल्या सदाशिव किसन सानप यांनी सांगितले आहे. सदाशिव किसन सानप हे हनुमान जगताप यांच्यासोबत गाडीवरती होते. राजकीय द्वेषापोटी माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे.
यापूर्वी त्यांचे ३ ते ४ ऑपरेशन झाले आहेत. कोरोना मधून आत्ताच सुखरूप बाहेर आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सत्ताधारी कार्यकर्ते यांनी मिळून आज माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे, असा आरोप हनुमान जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप यांनी केले आहे. या घटनेनंतर उशिराने जिल्हा रुग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर, जखमी हनुमान जगताप यांच्या नातेवाइकांनी, तुम्हीच यामध्ये सहभागी आहे. तुम्ही हे सगळे काही केले आहे. असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा