Subscribe Us

header ads

मौजे जोला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र विडा यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न


(केज प्रतिनिधी) :- मौजे जोला ता केज येथे सोमवार दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र विडा यांच्या वतीने (कोविशिड) कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य सेविका आश्राबाई केदार, आरोग्य सेविका अश्विनी सारुक , आशाताई ढाकणे, मोहर हांगे यांची उपस्थिती होती. या वेळी श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड यांचे सहकार्य लाभले.या लसीकरण सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीबप्पा ढाकणे  सरपंच तथा जिल्हाध्यक्ष भगवान सेना, आर.एम.आंधळे आरोग्य सेवक, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे , बाळासाहेब बिक्कड , गणेश ढाकणे,श्रीमती आश्राबाई केदार , अश्विनी सारुक आरोग्य सेविका, आशाताई ढाकणे सचिव श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज , रुक्मिणीबाई ढाकणे , मिरा ढाकणे, सुनीता केदार यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्य सेविका अश्विनी सारुक यांनी कोरोना संसर्गाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या आजाराविषयी अनेक चुकीचे भ्रम समाजात पसरवण्यात आले आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली व चर्चा केली.आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाय योजना व औषध उपचार पद्धती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन बाजीराव ढाकणे यांनी केले तर आभार गणेश ढाकणे समन्वयक श्री तुळजाभवानी महिला बहुउदेशिय सेवाभावी संस्था जोला यांनी मानले . मार्गदर्शन कार्यक्रमानंतर 150 लोकांना कोरोना लसीकरण करण्यात आली या कार्यक्रमासाठी गोविंद ढाकणे, सुनिता केदार, गणेश ढाकणे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा