Subscribe Us

header ads

शिक्षकाच्या खून प्रकरणी फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


बीड-: भर दिवसा एका शिक्षकाची हत्या करू फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात गेल्या अनेक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.  स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने  त्याच्या सेलू इथून मुसक्या आवळले असून त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या करण्यात आले आहे.  याप्रकरणात  आतापर्यंत 17 आरोपी  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी संतोष वाळके हे करत आहे. बालेपीर भागत एका शिक्षकाची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून काही आरोपींच्या मुस्क्या आवळले होते. मात्र त्यातील फरार आरोपी सरफराज शेख उर्फ सरू(वय 36. रा. बालेपीर) अनेक महिन्यापासून फरार होता. पोलीस त्याचा गेल्या अनेक  वर्षापासून शोध घेत होती. मात्र तो पोलिसांना गुंगारा देवून  जिल्हाबाहेर फिरत होता.  काल तो इतर राज्यातून (सेलू ता.परभणी) तिथे त्याच्या नातेवाईकाकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पीएसआय
संतोष जोंधळे आणि त्यांच्या टीमने सेलू येथे जाऊन सापळा  रचून काल सायंकाळी त्याच्या  मुसक्या आवळले रात्रीच त्यांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या सावधानी केले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  सदरील कारवाई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे, अशोक दुबाले, नसीर शेख, कैलास ठोंबरे, 
सखाराम पवार, रामदास तांदळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा