Subscribe Us

header ads

रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थितीत वंचितचा बीड मध्ये संवाद मेळावा -- ज्ञानेश्वर कवठेकर


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


(बीड प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश आध्यक्षा  रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच वंचित बहुजन आघाडी विभागीय अध्यक्ष आशोक हिंगे पाटील व पूर्ण विभागीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी बीड पूर्व व पश्चिम यांच्या संयुक्त मेळावा दि.४ सप्टेंबर रोजी बीड मध्ये होणार आहे, हा मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी दुपारी ११ वाजता पार पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी साहेबांची बायपास सर्जरी झाली आहे पण त्या पूर्वी साहेबांनी समाजाचा, संघटनेच्या, पक्षाच्या विचार करून वंचित बहुजन आघाडी प्रभारी प्रदेश आध्यक्षा म्हणून  रेखाताई ठाकूर यांची निवड केली साहेबांवर बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच दिवसानंतर रेखाताई ठाकूर या साहेबांच्या आदेशाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विर्दभ, खान्देश, या ठिकाणी दौरे सुरू केले त्या  ठिकाणचे दौरे यशस्वी करून त्या आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेश महासचिव अरुधंती शिरसाट,प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद तसेच वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे व पूर्ण विभागीय पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी असणारं आहेत या दौऱ्याची सुरुवात उस्मानाबाद येथून होऊन पुढे लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद करत या दौऱ्याच्या समारोप बीड येथे  दिनांक ४  सप्टेंबर रोजी होणार आहे येणाऱ्या नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणूकांचा अनुषंगाने हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे या मेळाव्याला उपस्थित राहून साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि या प्रस्थापितांची झोप उडाली पाहिजे एवढ्या प्रचंड संख्येने आपल्याला या मेळाव्यात सहभागी ह्यायचे आहे म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व भारिप बहुजन महासंघाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांन सह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच आदरणीय साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व बहुजन समाजातील सर्वांनी या मेळाव्यासाठी हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक ज्ञानेश्वर कवठेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा