Subscribe Us

header ads

राष्ट्रीयकृत बँका हया कोणाची वैयक्तिक खाजगी मालमत्ता नाही.:- किशन तांगडे.

बीड-: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचा मग्रूर पणा एका क्षणात घालविला.उच्च शिक्षित तरूणाची हि अवस्था असेल तर इतरांची काय अवस्था असेल?उच्च शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडे उच्च शिक्षित तरुणाने पैसे मागणे हा त्याचा संवैधानिक हक्क आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. माजलगाव येथील उच्च शिक्षित तरुण डॉ.अमोल मोरे याचे एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी पैशांची खूप गरज होती म्हणून त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजलगाव येथील शाखेकडे रितसर मागणी केली होती. त्या शाखेने काही दिवसात ती फाईल मंजुरी साठी बीडच्या मुख्य शाखेकडे पाठविली.पण या ना त्या कारणाने किँवा काही त्रुटी आहेत म्हणून  बीडच्या मुख्य शाखेने त्यांची फाईल थोडे तेवढे नाही तर तब्बल आठ महिने ती रखडून ठेवली.बँकेच्या खेट्या मारून मारून ते आणि त्यांचे मोठे बंधू पार वैतागून गेले.अशातच त्यांचे मोठे बंधू आनंद मोरे आणि मामा अभिमान उजगरे यांना किशन तांगडे यांची  आठवण आली आणि त्यांनी किशन तांगडे यांना फोन करून भेटावयाचे आहे,असे सांगितले.आणि भेट झाल्या नंतर त्यांनी या विषयाची सविस्तर हकीगत सांगितली.आणि काही मिनिटांत किशन तांगडे हे त्यांना सोबत घेऊन "जिल्हा लीड बँकेचे" कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर कदम साहेबांची भेट घेऊन त्यांना हि सर्व माहिती दिली.आणि कदम साहेबांनी मी स्वतः हे प्रकरण माझ्या हातावर घेतो आणि १००% मार्गी लावतो अशी किशन तांगडे यांना खात्री दिली.

*आणि विशेष म्हणजे श्रीधर कदम साहेबांनी दोन दिवसा नंतर किशन तांगडे यांना स्वतः फोन करुन तुम्ही सांगितलेले डॉ.अमोल मोरे यांचे आम्ही "सत्तावीस लाख रुपयांचे" प्रकरण मार्गी लावले आहे.*

सांगायचे तात्पर्य एवढेच की असे कर्तव्यदक्ष अधिकारी असतील तर निश्चितच सुशिक्षित तरुणाचा /गोर-गरीबांचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाल्या शिवाय राहणार नाही,हे मात्र नक्की.#
                   🙏
     "जय भीम"  "जय शिवराय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा