Subscribe Us

header ads

आवश्यक वस्तूची पूरग्रस्तांना मदत.

बदनापूर/प्रतिनिधी -  हाफीज हारुन पठाण 



बदनापूर-:,बदनापूर येथे मक्का मशिदीमध्ये शंभर क्विंटल गव्हाचे पीठ, डाळी, कडधान्य, तेल, मिरची, धान्य आणि इतर आवश्यक वस्तू अशी एकुण 150 क्विंटल पॅक करून आज सोमवारी ता.09 रोजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला असुन, या पूराच्या आपत्तीमुळे हजारो लोकांचे घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे पुरग्रस्तानां मदत करण्याचे आवाहन  उलेमा-ए-हिंदच्या  प्रदेश अध्यक्ष हाफीज नदीम सिद्दीकी च्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर, कस्तुरवाडी, देवगाव, कुसळी, निकळक, रोषणगाव, राजुर (ग.), फरीदाबाद, वरुडी, पिरसांवगी, खामगाव, दाभाडी, चिखली, डावरगाव, शेलगाव आदी गावातील सर्वसमाज बांधवांनी पूरग्रस्तांना गव्हाचे पीठ, डाळी, तेल, मिरची, धान्य आणि इतर आवश्यक वस्तू व आर्थीक स्वरुपात भरभरुन मदत केली आहे. सदरील अन्न धान्य, डाळी, कडधान्य, इतर आवश्यक वस्तू व आर्थीक मदत सांगलीतील पूरग्रस्तांना बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या समक्ष जमीयत उलेमा-ए-हिंदच्या वतीने पूरग्रस्तांना पाठविण्यात आली आहे. यावेळी  मौलाना जुबेर, मौलाना हारून पठाण, मौलाना अख्तर, मौलाना महमूद खान, रईस मौलाना, अब्दुल रहमान, मौलाना इब्राहिम, मौलाना अलीम, मौलाना औसाफ, मौलाना अय्यूब, मौलाना नसीर, मौलाना अतीक, मौलाना अलीम, मौलाना जावेदे, मौलाना जिलानी, मौलाना एजाज, मौलाना कलीम, मौलाना साहिम, मौलाना इरफान, आणि इतरांनी परिश्रम घेतले. जमीयत उलेमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना हसन नदवी, जि, सचिव मुफ्ती अ.रहमान नाएगावी, मुफ्ती अनिस ,नाजीम जामिया अबुहुरेरा फरीदाबाद वरुडी, मौलाना अहमद मिफ्ताही, मुफ्ती रमजान, मौलाना हबीब काशिफी यांनी आज बदनापूर येथील मक्का मशिदीत मदत वस्तूंची पाहणी केली. त्यावेळी हाजी सय्यद चाँद अमीर सहाब बदनापूर ,नगर सेवक शे.मतिन वस्ताद,सादीक कुरेशी, सय्यद मुनव्वर, शेख अजहर बदनापुरकर , जावेद बेग, वसीम खान डावरगांव, जावेद शाह,आदींची उपस्थित होते. पूरग्रस्तांना गव्हाचे पीठ, डाळी, तेल, मिरची, धान्य आणि इतर आवश्यक वस्तू व आर्थीक स्वरुपात भरभरुन मदत केली आहे. सदरील अन्न धान्य, डाळी, कडधान्य, इतर आवश्यक वस्तू व आर्थीक मदत सांगलीतील पूरग्रस्तांना बदनापूरचे तहसीलदार छाया पवार,व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या समक्ष जमीयत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जमीयतच्या पदाधिका-यांना पाठवून पूरग्रस्तांना पाठविण्यात आली आहे.जमीयत उलेमा ने सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा