Subscribe Us

header ads

सम्यक संबुद्ध विहारात विनायक प्राथमिक विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी.मो नवनाथ गोरे


बीड (प्रतिनिधी) कोरोना महा संकटा मुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यंदाच्या एस एस सी च्या परीक्षा अंतर्गत मूल्यमापना द्वारे घेण्यात आल्या यात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत भरघोस गुण मिळवले असुन त्यांचे कौतुक व त्यांचा  सन्मान करण्यासाठी विनायक प्राथमिक विद्यालया च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली पेठ बीड येथे पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक विद्यालयाचे *मुख्यध्यापक पवळ सर तर* *प्रमुख अतिथी म्हणून राजुजी जोगदंड,*
*नगरसेवक अँड विकासजी जोगदंड*,विनोद जोगदंड,विलास जोगदंड हे उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांना *मुख्यध्यापक पवळ सर, राजुजी जोगदंड, नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी सखोल असे मार्गदर्शन केले*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईकवाडे सर यांनी केले तर प्रास्ताविक अजितकुमार जाधव सर यांनी केले उपस्थितांचे आभार हंडीबाग मॅडम यांनी मानले
आदर्श जोगदंड, सिद्धार्थ जोगदंड सह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व इतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मंगेश जोगदंड,राजु राणू जोगदंड,गोरख जोगदंड,महादेव वंजारे सचिन जाधव,सह पालक विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा