Subscribe Us

header ads

परळी शहरातील भीम नगर येथील सार्वजनिक स्वच्छालयाची बोर दुरुस्त करून साफसफाई करण्यात यावी-- प्रेम जगतकर.

बीड स्पीड न्यूज 

परळी शहरातील भीम नगर येथील सार्वजनिक स्वच्छालयाची बोर दुरुस्त करून साफसफाई करण्यात यावी-- प्रेम जगतकर.  

परळी | प्रतिनिधी -: परळी शहरातील भीम नगर येथील सार्वजनिक स्वच्छता याची दुरुस्ती करून व जगतकर गल्ली येथील सखाराम जगतकर व माणिक जगतकर यांच्या घरासमोरील राहिलेल्या अर्धवट रोडचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथील सार्वजनिक स्वच्छालय पाण्याअभावी गेल्या दोन महिन्यापासून बंद पडले असल्यामुळे येतील नागरिक व महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सदरील स्वच्छालय पाणीपुरवठा करणारी इंधन विहीर बोर दुरुस्त करून देऊन त्या ठिकाणी योग्य नगरपरिषद कंत्राटी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी तसेच जगतकर गल्ली येथील रहिवासी सखाराम जगतकर व माणिक जगतकर यांच्या घरासमोरील अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशा प्रकारचे लेखी निवेदन परळी नगर परिषदेला दिले असून या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी तालुकाध्यक्ष राजेश भैय्या सर्वदे, तालुका उपाध्यक्ष अवि मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष राधाकिशन शिंदे भाऊजी, वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफार शहा पठाण, वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर, इत्यादीच्या सह्या असून सदरील मागणीची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नगरपरिषदेवर व्यापक ज्यांना आंदोलन छळण्यात येईल असेही लेखी निवेदन दिले असून सदरील निवेदन माननीय तहसीलदार यांनाही दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा