Subscribe Us

header ads

आता ए.टी.एम.मध्ये पैसे नसल्यास बँकांना आकारला जाणार दंड आर.बी.आय. चा मोठा निर्णय.

 
मुंबई-: ए.टी.एम.मुळे रोख पैसे मिळवण्याचा मार्ग खूप सोयीस्कर बनला आहे. पण, जेव्हा ए.टी.एम. मशीनमधून पैसे मिळत नाही तेव्हा ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळ तर ए.टी.एम. या बंद असलेल्या अवस्थेत आढळून येतात. आता ही समस्या लवकरच सुटणार आहे कारण आर.बी.आय.ने ए.टी.एम. मशीनमधून पैसे न निघाल्यास बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 ए.टी.एम.मध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे सामान्य लोकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. आर.बी.आय.चा हा निर्णय 
१ ऑक्टोबरपासून लागू होईल. आर.बी.आय.च्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२१ पासून जर बँकेच्या ए.टी.एम.मध्ये महिन्यात १० तास पैसे उपलब्ध नसेल तर त्या बँकेला दंड होऊ शकतो. 
आर.बी.आय.ने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, 
हा निर्णय घेण्यात आला आहे 
जेणेकरून लोकांना ए.टी.एम.द्वारे पुरेशी रोकड मिळू शकेल. “ए.टी.एम.द्वारे जनतेला पुरेशी रोकड उपलब्ध होईल याची खात्री करण्यासाठी, 
ए.टी.एम.मध्ये पैसे पुन्हा न भरल्याबद्दल दंडाची योजना आखण्यात आली आहे,
”असे आर.बी.आय.ने एका परिपत्रकात म्हटले आहे. 
भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटा जारी करण्याचा आदेश आहे आणि बँका त्यांच्या शाखा आणि ए.टी.एम.च्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटांचे वितरण करून हा आदेश पूर्ण करत आहेत. 
यासंदर्भात, असे म्हटले आहे की, ए.टी.एम.मध्ये पैसे नसल्यामुळे झालेल्या डाउनटाइमचा आढावा घेण्यात आला आणि असे दिसून आले की ए.टी.एम.मधील कॅश-आउटमुळे रोख रक्कम उपलब्ध होत नाही आणि जनतेच्या टाळता येण्यासारख्या गैरसोयी होतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा