Subscribe Us

header ads

शेख मोहसीन यांच्या आमरण उपोषणास अनेकांचा पाठिंबा बीड नगर परिषदेने लेखी पत्र देऊन सोडविले उपोषण

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 12 मधील विविध समस्या व मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन बुर्‍हानुद्दीन यांनी शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी बीड नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या उपोषणास वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना, राजकीय पक्ष व व्यक्तींचे मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाल्याने याची नोंद घेत बीड नगरपरिषदेने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची लेखी हमी देत उपोषण सोडण्याची विनंती केली आणि नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक येरगुडे यांनी त्यांना थंड पाणी पाजून उपोषण सोडावयास लावले.
या उपोषणामध्ये बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक बारात समाविष्ट असलेले रोशनपुरा, नय्यर खान कॉलनी, गोरे वस्ती, ख़दीजा नगर, भारतभूषण नगर, हमदान पार्क या परिसरांमध्ये करायचे राहिलेले सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे तसेच अटल अमृत योजनेच्या पाईपलाईन चे कार्य, शिवाय गोरे वस्तीत जाण्यासाठी बांगर नाल्याला लागून क्रॉसिंगचे सहा पूल बनविण्यात यावे. तसेच बालेपीर भागात लावण्यात आलेल्या नवीन विद्युत खांबांवर एलईडी दिवे लावण्यात यावे व पाणीपुरवठा सात दिवसआड करण्यात यावा. या मागण्या प्रमुख होत्या.
या उपोषणात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे सय्यद फरहान, नविद बाबा खान, लोकसेना संघटनेचे इलियास इनामदार, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, एआयएमआयएम पक्षाचे नेते शेख निजाम, काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. इद्रीस हाश्मी, सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा व सुलतान बाबा, टिपू सुलतान संघटनेचे इम्रान इनामदार व आदिल इनामदार, शेख हबीब, आबेद, अलाउद्दीन, जमील, नाजेद, मुज़म्मील, अमजद, सरफराज, ख़मरूल ईमान, तालब, सादेख़ अली, अकबर, अब्दुल रहीम, अमजद, इरफान, आम आदमी पक्षाचे सय्यद सादेख़ आदींनी प्रत्यक्ष सहभागी होऊन समर्थन दिल्याने याची नोंद घेत बीड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक येरगुडे यांनी उपोषणार्थींनी केलेल्या मागण्यांवर लवकरच निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल. अशा आशयाचे लेखी हमीपत्र देऊन उपोषणकर्ते शेख मोहसीन यांना थंड पाणी पाजून उपोषण सोडावयास लावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा