Subscribe Us

header ads

अश्लील व्हिडिओ दाखवून बापाने केला मुलीवर अत्याचार.


परभणी-: जिल्ह्यातील पाथरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार केला.  आरोपी नराधम बापास पोलिसांनी अटक केले. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील बेकार मोहल्ला येथे राहणाऱ्या नराधम बापाने 10 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या 14 वर्षीय मुलीस अश्लील व्हिडिओ दाखवून मुलीवर अत्याचार केला. एवढंच नाही तर ही बाबा जर आईला सांगितलं तर तिला फिनाईल पाजून जीवे मारण्याची धमकीही दिली. त्या भीतीने मुलगी अत्यंत भयभीत झाली होती. मात्र दोन दिवसांनी या मुलीने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. 
 या घटनेनंतर आईने मुलीला घेऊन थेट पाथरी पोलीस ठाणे गाठले आणि  नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली.  ज्यावरून पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी बापाविरुद्ध  गु.र.नं 364/2021कलम 376 (2) फ 354
ब 506  भादवी पॉसको 3, 4  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे ही करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा