Subscribe Us

header ads

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवत भाजपाने केला अपमान कल्याण सिंह यांच्या अंत्यदर्शनावेळी घडला प्रकार भाजपाविरोधात संताप.

 लखनऊ-: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले होते . दरम्यान रविवारी त्यांच्या पार्थिवाचे  अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालते का ? अशी विचारणा केली आहे.
युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.
भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.भाजपाने ट्वीट केलेल्या फोटोत कल्याण सिंह यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेला दिसत आहे. यावेळी तिरंग्यावर अर्ध्या भागात भाजपाचा झेंडाही दिसत आहे. यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी लखनऊमध्ये पोहोतून कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा