Subscribe Us

header ads

ग्रामसेवकच्या निष्काळजीपणाने वाकनाथपुर गाव अंधारात


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880


(वाकनाथपुर प्रतिनिधी) ग्रुप ग्रामपंचायत वाकनाथपुर येथे काही दिवसापूर्वी सौरऊर्जावर चालणाऱ्या काही लाईट बसवण्यात आल्या होत्या लाईट बसऊन काही दिवस झाले की काही लाईट बंद पडल्या आहेत. आणि काही लाईट चालु आहेत त्या रात्री १० ते ११ वाजताच बंद होतात ग्राम सेवक यांना याची माहिती देण्यात आली असता ग्राम सेवक यांनी काही लाईट दुरुस्ती साठी पाठवल्या आहेत पण २ ते ३ महिने झाले तरी लाईट आणखीन बसवण्यात आल्या नाहीत.
आम्ही लाईट दुरुस्ती करणाऱ्याला विचारले असता तो बोलतो लाईट सर्व दुरुस्त झाल्या आहेत पण ग्रामसेवक लाईट घेउन जात नाहीत मंग ग्रामसेवक हे जाणून बुजून गावचा विकास करत नाहीत.ग्राम सेवक हे गावचा विकास का करत नाहीत हे वरीष्ठ अधिकारी साहेबानी चौकशी करावी.गावात नाल्या साफ नसल्याने नाल्याचे पाणीरोडवरूनवाहत आहे खुप मच्छर झालेत आहेत मच्छर चावल्याने गावातील नागरिकात थंडी तापीचे प्रमाण खूप वाढले आहे. ३ वर्ष झाले हातपंप बंद आहे तो ही ग्रामसेवक चालु करत नाहीत ग्राम सेवक हे गावातील नागरिकांच्या आरोग्याशी का जाणून बुजून खेळत आहेत
ग्राम सेवक हे फॅक्त गावातील नागरिकांच्या जीवनाशी खेळण्यासाठी नोकरी करत आहेत का याची चौकशी वरीष्ठ अधिकारी यानी लवकरात लवकर करावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा