Subscribe Us

header ads

डॉ.नाजिया यांची बदली थांबवा नसता नागरिकांचा जिल्हा शाल्यचिकित्सक यांचे विरोधात उपोषणा चा ईशारा


नेकनुर-: नेकनूर येथे स्त्री कुटीर रुग्णालय सध्या चर्चेत आला आहे. कारण एक डॉ. नाजिया यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश (सि.एस) जिल्हा शाल्यचिकित्सक यांनी कोणतेही कायदेशीर कारण नसतांना साहेबांनी कोणाचेही  ऐकून न घेता चार, दोन पत्रकार व चार, दोन पेपरच्या बातम्यांच्या आधारे एक चांगल्या समाजसेवक व मनमिळावू व पेशंटची स्वतः काळजी करणारे डॉक्टर नाजिया यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिले. कारण चार,दोन पत्रकारांनी हस्तपेक्ष केल्याने कोणत्याही वर्ग १ चे अधिकाऱ्यांची बदली होत असेल तर हे बाब खूप गंभीरयाने घेण्याची गरज आहे. पत्रकार आता आरोग्य विभाग चालवणार का असा प्रश्न नेकनूर व परिसराचे नागरिकांना पडला आहे .
घडलेला प्रकार असा की नेकनूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक विलास जाधव साहेब हे एक आरोपी (पेशंट) घेऊन तपासणी (मेडिकल) करण्यासाठी स्त्री रुग्णालय येथे गेले असता तेथे डॉक्टर नाजिया हे कार्यरत होते. त्यांना तपासणीसाठी येण्यास दहा ते पंधरा मिनिट उशीर झाला त्यानंतर त्यांच्या आणि पोलीस उपनिरिक्षक विलास जाधव साहेब यांच्यात  काही बोलणे झाले.व दुसऱ्या दिवशी काही दैनिकात डॉ.नाजिया यांच्या बदनामी करण्याच्या हेतूने बातमी प्रकाशित केली.१३ वर्षापासून यांच्याकडून अन्याय झाला. पेशंटला नीट वागणूक मिळत नाही. पेपर फेकून देत आहे. पेशंट बघत नाही अशी खोटे आरोप लावून काही दैनिकात बातमी प्रकाशित केली. तात्काळ सि.एस साहेबांनी प्रकरणाची कुठलीही चौकशी न करता मॅडम नाजीया यांना डीपोटेशन वर माजलगाव येथे पाठवण्याचे आदेश काढले.साहेबांनी चौकशी समिती नेमून चौकशी करणेचे आदेश देणे अपेक्षित होते.स्वताच्या स्टॉप कडून चौकशी करणे गरजेचे होते. समक्ष पोलीस उपनिरिक्षक विलास जाधव साहेब यांच्या कडून झालेल्या प्रकरणाचे विचारपूस करायला पाहिजे होते. व वरिष्ठांकडे लेखी तक्रार करा व लेखी म्हणणे देण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. मात्र साहेबांनी असे न करता तडकाफडकी बदली (डिपोटेशन) चे आदेश दिले.
नेकनूर व परिसरातील नागरिक सी.एस साहेबांना लेखी निवेदन देणार व त्यांना विचारणार की एकतर्फा आदेश कसा काढला. तसेच डॉ.नाझिया यांची डीपोटेशन रद्द करून नेकनूर रुग्णालयात सेवा करण्याचे आदेश देण्यात यावे.
नसता आम्ही नेकनूरकर व परिसरातील नागरिक स्त्री रुग्णालय नेकनूर येथे उपोषण करणार आहेत. असा इशारा नेकनुर व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.मा. सी एस साहेब जिल्हा शास्त्र चिकित्सक बीड.जिल्हाधिकारी साहेब बीड आमदार नमिता ताई मुंदडा जिल्हा परिषद आरोग्य विभाग माननीय आरोग्यमंत्री राजेश जी टोपे साहेब.माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब संबंधित प्रकरणाची चौकशी करण्या साठी चौकशी समितीची नेमणूक करावे व सदर तक्रार लेखी अथवा तोंडी आहे ते पाहण्यात यावे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तंत्रज्ञांना कडून तपासणी करण्यात यावी.व असे एक दिवसातच फिल्मी स्टाईल एक दिवसाचा मुख्यमंत्री परमाने नायक सारखी भूमिका साकारण्याचे सीएस साहेबांनी टाळावी.
अशी माहिती नेकनूर येथील खतीब मतीन (समाजसेवक), काझी नवीद, एडवोकेट शेख असलम आरिफ (शाफे) यांनी एका पत्रकाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांना  कळवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा