Subscribe Us

header ads

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ.

मुंबई-: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मागितले होते. अटकेची कारवाई टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की कायदेशीर उपाय फक्त कायदेशीर तरतुदींनुसारच करता येतात.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे. यामध्ये त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. जी त्यांच्या आणि कंपनीच्या नावावर होती. याप्रकरणी आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई म्हणजेच ईडीेने अटक करु नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी इतर उपलब्ध पर्यांयाचा देशमुख यांनी वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावले होते.
अनिल देशमुखांना आता अटक टाळायची असेल तर त्यांनी रीतसर अटकपुर्व जामीनाठी कोर्टात याचिका करावी. त्यावर मुंबईतील स्थानिक न्यायालय निर्णय घेते. आम्ही तुम्हाला कुठलाही दिलासा देऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे.
यापूर्वी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता, ज्याच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने देशमुख आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा