बीड (प्रतिनिधी):- हिंदु धर्मातील पवित्र महिना असलेल्या श्रावण महिन्यात शिव शंभो भोलेनाथ मंदिर परिसरात भाविक भक्तांची गर्दी असते. शहरापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले कपीलधार येथील मन्मथ स्वामी मंदिराकडे श्रावण महिन्यामुळे भक्तांची ओढ सुरु आहे. श्रध्दास्थान असलेल्या कपीलधार परिसरात सध्या धबधबा ओसंडून वाहत आहे. धबधबा पाहण्यासाठी महिला-मुलींची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु आहे. मंदिर परिसरात महिलांसोबत छेडछाड, त्यांच्या सुरिक्षतेतचे प्रश्न निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाने पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील श्रध्दास्थानापैकी एक कपीलधार मंदिर परिसराकडे पाहिले जाते. पवित्र श्रावण महिना सुरु
झाल्याने भक्तांची कपीलधारकडे ओढ सुरु झाली आहे. निसर्गरम्य वातावरण असल्याने आणि त्यातच धबधब्यामुळे महिला-मुलींची मंदिर परिसरात गर्दी होत असून मंदिर परिसरात कोणतीही दुर्घटना किंवा महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळा येथे अशा घटना घडलेल्या आहेत. टवाळखोर पोरांमुळे महिला-मुलींना मनमोकळेपणाने मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटता येत नाही. त्यांच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होवू नये, कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कपीलधार मंदिर परिसरात पोलिसांची नियुक्ती करावी. विशेष करून महिला पोलिसांचीही नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांनी केली आहे.
0 टिप्पण्या