Subscribe Us

header ads

हातपंप बंद पाणी पट्टी सुरू वाकनाथ पुरच्या ग्रामसेवकांची मनमानी!


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो. 9823310880


(वाकनाथपुर प्रतिनिधी) वाकनाथपुर येथील ग्रामसेवकांचा मनमानी कारभार चालु आहे मनात येईल तसेच करतात. बीड ता .वाकनाथपुर हे गाव जेमतेम ६००.ते ७०० लोकसंख्येचे गाव आहे या गावचा विकास आणखीन झाला नाही.
गावामध्ये शाळेच्या बाजूला एकच हातपंप आहे शाळेतील मुलं जेव्हां शाळेत जेवण करतात तेव्हा या हातपंपावर हाथ धुण्यासाठी येतात गावामध्ये जेव्हां लाईट नसते तेव्हा याच हातपंपावरून सर्व गावकरी पाणी भरत असतात पण हाच हातपंप गेले तीन चार वर्ष झाले बंद पडला आहे 
आनेकवेळा ग्रामसेवक यांना शाळेतील शिक्षकानी सांगीतले
गावकऱ्यांनी सांगीतले पण ग्रामसेवक यांना काही फरक पडत नाही गावातील काही शेतकऱ्यांनी शेतातून पाइप टाकून पाणी गावात आणले पण जे गरीब आहेत त्यांनी पाणी कोठून आणायचे काही नागरिक पिण्याचे पाणी ४ की मी वर असणारे म्हाळस जवळा येथून गाडीवर पाणी आणतात ग्राम सेवक हे गावकऱ्यांचे हाल करून फक्त पाणीपट्टी मागण्यासाठी आहेत का ?
ग्रामसेवकांना एक हातपंप दुरुस्त करण्यासाठी तीन चार वर्ष लागतात का? जर पाणी प्रश्न ग्रामसेवकांना सुटत नसलं तर ते ग्रामसेवक गावचा विकास काय करणार
शाळा जर सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांनी कोठे हाथ धुण्यासाठी जायचे लाईट गेल्यावर गावकऱ्यांनी पाणी कोठून आणायचे असे अनेक प्रश्न गावकरी करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा