Subscribe Us

header ads

कुक्कडगाव, खुंड्रस, रामगाव, चव्हणवाडी, येथील सिंदफना नदी पात्रातुन दिवस-रात्र वाळू उपसा चालूच, जिल्हाधिकारी साहेब थोडे लक्ष घाला.

(बीड प्रतिनिधी) कुकडगाव खंडोबा मंदिर शेजारील नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत दिवस-रात्र अवैधरित्या कलम 144  नियमाचे उल्लंघन करून वाळूउपसा चालूच,  पण कुठलाही अधिकारी कडक कारवाई करताना का दिसत नाहीत...? कुक्कडगाव .खुंड्रस . रामगाव  चव्हणवाडी येथील शिंदफणा  नदी पात्रातुन हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा केला जात आसतांना महसुलचे उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार हे कोणतीही कारवाई करत का नाही.  अशी सर्वत्र बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.  प्रशासन फक्त सर्वसामान्य वरच कारवाई करणार का वाळू माफिया वर का कडक कारवाई करत नाही. तर मंडळधिकारी तर समोरून जाणाऱ्या वाहनावर देखील कारवाई करत नाहीत  आणि कुक्कडगावं .राक्षसभुवन  खुंड्रस रमगाव  येथे जाऊन पहाणी केली मात्र तेथेही कोणतीही ठोस कारवाई केली नाही याचा अर्थ काय समजायचा?*
तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्यात कळवले असता ठाण्याचे पोलिस. कार्यवाही न करता तो महसुलचा विभागाचा विषय आहे म्हणून हात वर करत आहेत.
मग या वाळु माफिया यांच्याविरोधात कार्यवाही कोण करणार? रोज हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा रात्र न दिवस करुन विना रॉयल्टी पावतीची अवैधरीत्या वाहतुक केली जात असतांना महसुल व पोलिस प्रशासन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गप्प का?? 
बीडचे महसुल व पोलिस प्रशासन वाळु माफिया विरोध कार्यवाही करेल कि नाही याची शाश्वती नाही यामुळे मा. सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा. राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी बीड यांनी लक्ष घालून कोणी अर्थीक उलाढाल करत असेल तर त्यांची चौकशी करुन निलंबीत केले पाहिजे.
आणि वाळू माफिया विरुध्द ठोक पाऊले उचलून योग्य ती कारवाई केली पाहिजे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा