Subscribe Us

header ads

महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा केला पार

मुंबई-: महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. काल म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला.तर देशानेही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.लसीकरणाच्या बाबतीत भारताने विक्रमी प्रगती केली असून आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ५५ कोटी मात्रा दिल्या आहेत. करोना विरोधातील भारताचा लढा बळकट करा. लसीकरण करून घ्या!’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केले.१० कोटींचे लसीकरण पूर्ण करण्यास भारताला ८५ दिवस लागले. २० कोटींच्या लसीकरणासाठी यानंतर ४५ दिवस, ३० कोटींसाठी आणखी २९ दिवस, ४० कोटींचा आकडा पार करण्यास आणखी २४ दिवस लागले. ५० कोटी लसीकरण त्यानंतर २० दिवसांनी, म्हणजे ६ ऑगस्टला पूर्ण झाले. १४ ऑगस्टला हा आकडा ५४ कोटींपलीकडे गेला.दरम्यान, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सर्व स्रोतांच्या माध्यमातून करोना प्रतिबंधक लशींच्या ५६.८१ कोटीहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. यापैकी वाया गेलेल्या मात्रा मिळून एकूण ५४,२२,७५,७२३ लसमात्रांचा वापर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा