Subscribe Us

header ads

नारायण राणें यांनी जन आशीर्वाद यात्रेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसई विरारमध्येह गुन्हे दाखल.

मुंबई-: केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोरोना नियमांचे तसेच आदेशांचे  उल्लंघन केल्याप्रकरणी उपस्थितीत वसई-विरारमध्ये काढण्यात आलेल्या वसई-विरारमधील सहा पोलीस ठाण्यात वेगेवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी वसईत जन आशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेचे आयोजन भाजपातर्फे करण्यात आले होते . यात्रेदरम्यान ठिकठिकाणी गर्दी जमविण्यात आली होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय मनाई आदेशांचेही उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे आयोजक भाजपा पदाधिकार्‍यांविरोधात काशिमिरा, वालीव, माणिकपूर, तुळींज, विरार आणि वसई पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३४१, २६९, २७० सह साथरोग प्रतिबंधात्मक कायद्या मधील खंड २,३,४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाना २००५ च्या कलम ५१ (ब) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमनच्या कलमांतर्गत ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 मुंबईत भाजपच्या जन आशीर्वाद 

यात्रेवर ४२ गुन्हे दाखल

भारतीय जनता पक्षाने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईत ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी १९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यामध्ये आणखी २३ गुन्ह्यांची भर पडली. विनापरवानगी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा