Subscribe Us

header ads

मनोरुग्ण वडिल , बांगड्या विकणारी आई , ऑटोचालवणारा भाऊ अन् तुराट्याच्या कुडावर छिद्र पडलेले पत्रे अशा घरात जेंव्हा शेख वाशिमा महेबुब' उपजिल्हाधिकारी होते.


(अंबाजोगाई प्रतिनिधी) या बातमीवर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे त्रिकालाबाधित सत्य आहे, की ज्या मुलीचे वडील मनोरुग्ण आहेत. जीची आई घरोघरी जाऊन एका खेड्यात महिलांना बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते, ज्या मुलीचा भाऊ गावात ऑटो चालवतो , आणि ज्या मुलीच्या घरावर ,केवळ चार पत्रे, ते पण तुराट्याच्या कुडा वर टाकलेले आहेत.  पत्र्यांना छिद्र पडलेली आहेत, अशा अवस्थेत एक मुलगी जिचं नाव शेख वासिमा महबूब, कठोर परिश्रम घेते, गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन, पुढे जाते आणि जिद्द व चिकाटीच्या बळावर लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन उपजिल्हाधिकारी होते.हा चमत्कार नाही ,ही सत्य कहाणी आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सांगवी  जोशी  गावच्या एका मुस्लिम समाजातल्या मुलीची. त्यामुळे तरुणांनी यशाकडे जाताना हा आदर्श जरी घेतला, तरी बस. असा हा चमत्कार म्हणावा लागेल.लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम पी एस सी च्या परीक्षेत राज्यातील अनेक होतकरू  मुला-मुलींनी गुणवत्तेच्या आधारावर बाजी मारली. सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र एक उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली, त्या वाशिमा महबूब या मुलीचं करावं तेवढं कौतुक कमीच म्हणावे लागेल. खरं म्हणजे लहाण पणा पासून खेडयात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुलगी शिकलेली आहे. दुसऱ्या बाजूने आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, वडील मनोरुग्ण आहेत. मात्र दोन लेकरांना सोबत घेऊन तिची आई गावात बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते. तेवढ्याच मिळालेल्या मोलमजुरी वर  संसार चालवत लेकराच शिक्षण पुर्ण केल . दुसरा मुलगा ऑटो रिक्षा चालवतो. खरं म्हणजे राहण्यासाठी पण घर नाही. चार पत्र्याचे घर, सहज फोटो डोळे फाडून पाहिला, तर परमेश्वर किती चमत्कार करतो, याचं हे उत्तम उदाहरण होय . मुस्लिम समाजात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यानंतर, कशाप्रकारे यश मिळवतात याचं हे उत्तम उदाहरण. अत्यंत संघर्ष करीत, नव्हे तर एका भाकरीच्या घासासाठी कष्ट केलेल्या या घरातून उपजिल्हाधिकारी म्हणून मुलगी जेव्हा पुढे येते, तेव्हा तिच्या अंगी असलेली जिद्द, आणि चिकाटी, ही गुणसंपदा खऱ्या अर्थाने प्रेरणा घेण्यासारखी आहे. वास्तविक पाहता शिक्षणासाठी कुठलीही मदत झाली नाही, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी साधन सुविधा मिळाल्या नाही. मात्र एक गोष्ट खरी होती. तिला नेहमीच डोळ्यासमोर आपले  स्वप्न आणि आई वडिलाचा  संघर्ष दिसत होता. वडील मनोरुग्ण असल्याने आईच्या बळावर तिने जोरदार यश मिळवले. घरी बसून स्पर्धात्मक पुस्तकांचे वाचन करताना, क्षणक्षण अभ्यास केला आणि नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालात उपजिल्हाधिकारी म्हणून या मुलीची निवड झाली. खरंतर सोशल मीडिया, फेसबूक ,या प्रसार माध्यमावर जेव्हा त्या मुलीच्या आई-वडिलांचा फोटो आणि तिच्या घराचा फोटो आला. तेव्हा  याच घरातील वासिमा उपजिल्हाधिकारी झाली, यावर कोणाचा विश्वास बसला नाही.  मात्र हे त्रिवार सत्य आहे, की जीवनात पुढे जाताना किंवा यश मिळवताना केवळ श्रीमंती लागते असे नव्हे. पैसे वाल्यांची मुलं पुढे जातातच असंही नाही .रात्रीचा दिवस  केला, आणि एक भाकरीचा घास, चार वेळा खाल्ला, एवढी गरिबी  पण तरी अंगी जिद्द, असेल चिकाटी, असेल आणि यशाकडे जाण्यासाठी सामर्थ्य असेल तर कोणीच रोखू शकत नाही. हे वासिमा महबूब या मुस्लिम समाजातील एका होतकरू मुलीने समाजाला दाखवून दिले. हा आदर्श खरोखरच घेण्यासारखा आहे, समाजात असं काही चांगलं घडलं म्हणून लोकांच्या समोर, आदर्श दाखवण्यासाठी हा लिहिण्याचा उठाठेव आम्ही केला. एक मात्र नक्की, मुस्लिम समाजाने मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा दिली, तर त्या किती पुढे जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाशिमा होय. आज तिला यश मिळालं. निश्चितच आईच्या डोळ्यातील आनंद, वडिलांच्या डोळ्यातील आनंद, आकाशात मावेत नसेल. हे अगदी खर आहे. आई वडिलांच्या स्वप्नात आपल भविष्य दडलेल असत हे जरी तरुणांना कळल तरी खुप भाग्य म्हणायचे

*वासीमा मेहबूब शेख चे मनापासून अभिनंदन*💐💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा