Subscribe Us

header ads

राक्षसभुवन येथून वाळु साठा जप्त : वाळू माफिया विरुद्ध मौक्का अंतर्गत गुन्हे दाखल का होत नाहीत.??


(गेवराई प्रतिनिधी) तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन महसुल व प्रशासन यांच्या  बेजबाबदार   पणे अवैध वाळु उपसा करुन ट्राक्टर, टीप्पर, व हायवा, या आवजड वाहनांद्वारे अवैध वाळु वाहतुक केली जाते. एका वृत्त वाहिनीने वाळु उपसा करत असल्याच्या ठीकाणावरुन लाईव्ह चित्रीकरण करत बातमी प्रदर्शित केल्यानंतर उशीराने रविवार रोजी गौणखनिज विभागाने चकलांबा पोलिस व महसुल प्रशासन यांना बोलावुन घेत राक्षसभुवन (शनिचे) येथे नदीकाठावर केलेला वाळु साठा जप्त केला मात्र तेथून वाळू साठा उचलला नसून दि. २ सोमवार सकाळपर्यंत  कोणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमुख विजय देशमुख यांनी दिली. तसेच तहसिलदार सचिन खाडे यांच्याशी संपर्क साधला असता मायनिंग वाल्यांनी कार्यवाही केली असून गुन्हा दाखल केला किंवा नाही याची मला माहिती नाही असे
 महिना पंधरा दिवसातुन एखादी छोटीशी कार्यवाही करुन महसुल व पोलिस प्रशासन आपली पाठ थोपटुन घेण्याचे काम करत चर्चा तालुकाभर होत आहे.
 राजरोस दिवसा ढवळ्या चकलांबा पोलिस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गुंतेगाव, गुळज, सुरळेगाव, राक्षसभुवनसह तालुक्यातील गोपत पिंपळगाव, गोंदी, सावळेश्वर येथुन वाळु माफिया जेसीबी, केणीद्वारे सर्रासपणे अवैधरीत्या वाळु उपसा करुन जेसीबी,लोडरद्वारे १० ते १२ हजार रुपयाला टीप्पर तर १५ ते १८ हजार रुपयात हायवा यासारख्या आवजड वाहनात वाळु भरुन देतात. पुढे हिच वाहणे गेवराई, बीड, शिरूरसह (कासार), परजिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव या शहरात पुरवठा करतात.
 आवजड वाहनांद्वारे अवैध वाळु वाहतुक केली जात असतांना पोलिस प्रशासन व महसुल प्रशासनातील अधिकारी जाणिवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याने गोदाकाठच्या गावच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 गौणखनिज विभाग, महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन व पर्यावरण विभागाने वाळु माफिया विरोधात संयुक्तरित्या कठोर कार्यवाही करुन मौक्का कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी गोदाकाठचे जेष्ठ नागरिक करत आहेत.
राक्षसभुव येथुन केणीद्वारे होत असलेल्या अवैध वाळु उपशाला चकलांबा पोलिसांची  संगणमत असल्याची चर्चा  सर्वत्र तालुक्यात आहे. अवैध वाळु उपसा करन्यासाठी रोखीने हप्ता न घेता उपसा केलेल्या वाळु पैकी काही प्रमाणात वाळुची हिस्सेदारी घेण्यात येते अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.
वाळू माफिया महसुल भरल्याची पावती घेवुन वाळु साठा उचलण्याच्या नावाखाली पुन्हा नदिपात्रातुन भरमसाठ अवैध वाळु उपसा करून अवजड वाहनांद्वारे दिव रात्र खुलेआम वाहतुक केली करतात. वाहन पकडले  की महसुल भरल्याची पावती  दाखवण्यात येते व वाहन सोडुन घेण्याचा गोरख धंदा जोमात सुरू करतात. गोदापात्रातुन अवैध वाळु उपसा केलेला साठा जप्त केला जातो मात्र वाळु उपसा करणारे पकडले जात नाहीत. नदिपात्रातुन वाळु साठा आपोआप नदीकाठावर येवुन पडतो  कसा काय?   हा प्रश्न तालुक्यामधल्या  सद्यस्थिती पाहणाऱ्या नागरिकांना  पडला आहे.

तालुक्यातील पत्रकार प्रश्न विचारतात म्हणून नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी अनेक पत्रकारांचे भ्रमणध्वनी क्रमांक काळ्या यादीत टाकले आहेत. जनतेचे प्रश्न पत्रकार प्रशासनातील अधिकार्‍यांना मार्गी लावण्यासाठी विचारत असतात परंतु त्यांचे प्रश्न न ऐकता काळ्या यादीत नंबर टाकनाऱ्या नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी पत्रकार करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा