Subscribe Us

header ads

आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

बीड (प्रतिनिधी):-  शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष अक्षय माने यांनी राष्ट्रवादी भवन येथे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड.डी.बी.बागल,  माजी आमदार सुनील धांडे, माजी आ.सय्यद सलीम भाई, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव के.के.वडमारे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, तालुकाध्यक्ष महादेव  उबाळे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवसंग्राम पक्षातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक कार्य पद्धतीने अक्षय माने यांनी युवकांचा संघटन निर्माण करून एक व्यापक चळवळ उभा केली होती. मात्र कक्षांमधून आमदार विनायक मेटे यांच्याकडून सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे काल त्यांनी शिवसंग्राम पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रीय बांधकाम संघटनेच्या माध्यमातून आवश्यक ती सुरक्षा किट आणि दोनशे पेट्याच वाटप राष्ट्रवादी भवन बीड येथे करण्यात आले. यावेळी त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमासाठी ग्रामीण व शहरी भागातील अनेक बांधकाम कामगार मजूर महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे अमीर शेख यांनी केले तर प्रास्ताविक भाषणामध्ये अक्षय माने यांनी सामाजिक आणि सार्वजनिक केलेल्या कामाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सहकाऱ्यांना थोडक्यामध्ये सांगितली. आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी अक्षय माने यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी सुशील जाधव, दादा हातागळे, शुभम कोतवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा