Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस

बीड -: बीड जिल्ह्यात रात्रभर दमदार आणि मुसळधार पावसाने  चांगलीच हजेरी लावली होती.यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील मनकर्णिका , मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह  अनेक लहान नद्यांना पूर आला आहे. तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान देखील झाले आहे.त्याच बरोबर वादळी वारा आल्याने ऊस, मका, कापूस पिके लोळली गेली आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने चागलीच हजेरी लावल्यामुळे, जिल्ह्यातील प्रमुख नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा