Subscribe Us

header ads

हातात पिस्तूल घेऊन व्हिडीओ शूट करणारा पोलीस निलंबित!

 अमरावती-:अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला अशा प्रकारे व्हिडीओ शूट करुन सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणं फारच महागात पडलं आहे. या व्हिडीओ प्रकरण पोलीस खात्याने कठोर कारवाई करत या कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन या कर्मचाऱ्याने एका व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हा पोलीस कर्मचारी एक डायलॉग मारतो आणि नंतर पिस्तूल दाखवताना दिसत आहे. आपली डायलॉगबाजी झाल्यानंतर हा कर्मचारी मोटरसायकलवरुन उठून पुढे चालू लागतो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने या व्हिडीओची दखल घेतली आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही पोलीस खात्यात कामाला असल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस खात्याने यासंदर्भात कठोर कारवाई केली आहे. ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ  चांदूरबाजार येथील पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये सध्या तरी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा