Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक औरंगाबाद येथे संपन्न आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ला पसंती ---अशोक हिंगे पाटील

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे



प्रतिनिधी / बीड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व  प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आढावा बैठक चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद या ठिकाणी मराठवाडा समितीने आढावा दौ-याचा बैठकीचा समारोप केला.. मंगळवारी, दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनुहिल गार्डन, औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मराठवाडा विभाग अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, या वेळी बहुजन आघाडीची धोरणे व सर्व सामान्य वंचितांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी वंचित बहुजन हाच एकमेव सक्षम पर्याय सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध झाला आहे असे प्रतिपादन, अशोक हिंगे यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थितीत मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, अँड अशोक खरात, मराठवाडा विभागीय कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट, डॉ.नितीन सोनवणे, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन,पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड.लताताई ब्राम्हणे, शहराध्यक्ष वैशाली ताई नरवडे  यांच्या सह जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी युवक पदाधिकारी महिला पदाधिकारी संमेक विद्यार्थी आघाडी सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




*शिवबा स़घटनेचे नेते यांनी आपल्या पदाधिकारी 
यांच्यासह वंचित बहुजन आघाडी मधे  केला प्रवेश*


शिवबा स़घटनेचे नेते यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी मधे अशोकराव हिंगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्याचे स्वागत पुष्पहार शाल  घालुन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा