Subscribe Us

header ads

ई-पिक पाहणी प्रशिक्षणात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. -- जिल्हाधिकारी राधाबिनोद अ. शर्मा.

बीड, दि.25 (जि.मा.का.):-  बीड जिल्हयातील सर्व 11 तालुक्यांत ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापुर्वीच मान्यता दिली आहेमोबाईल ॲपवर ई-पिक पाहणी ॲप उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेत्यामध्ये बीड जिल्हयाचा समावेश कलेला आहे.

               आपण त्वरीत प्लेस्टोअर वर जावून आपल्या मोबाईल मध्ये नविन  -पिक पाहणी ॲप डाऊनलोड करावे व  पुर्वीचे जुने ॲप डिलिट करावे.आपणास ई-पिक पाहणीचे तलाठी व कृषी सहाय्यक यांचेमार्फत गाववार प्रशिक्षण देण्यात येणार आहेज्यामध्ये आपला सहभाग मोलाचा आहे.

                गावातील सरपंचपोलीस पाटीलतलाठीग्रामसेवककृषी सहाय्यककोतवालधान्य दुकानदारतंटामुक्ती अध्यक्षबचत गट प्रतिनिधीअध्यक्षसहकारी सचिवशेतकरी उत्पादक संघ अध्यक्षमाविम संयोगिणीपाणी फाउंडेशन गटपोकरा प्रतिनिधीग्रामरोजगार सेवकतांत्रिक सहाय्यकबॅक प्रतिनिधीशाळा व कॉलेज विदयार्थीप्रगतीशिल शेतकरीडॉक्टर्ससर्व ग्रामपंचायतपंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यमिडीया प्रतिनिधीआपले सरकार सेवा केंद्र इप्रशिक्षणात सहभागी व्हावेई-पिक पाहणी सर्वानी व्हॉटसअप असल्यास ग्रुपच्या माध्यमातून ई-पिक पाहणी ॲपच्या संबंधी माहिती घ्यावी.

              यापुढे ई-पिक पाहणी काम शेतकऱ्यांना स्वत:च ई-पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेज्यामुळे शेतकऱ्यांना तलाठयांना शोधण्याची गरज भासणार नाही.

               -पिक पाहणी सोबतच ईतरही विविध नोंदी शेतकऱ्यांना करता येणार असल्यामुळे पिक विमापिक कर्जशासकीय मदत ईविविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहेआपले संबंधित तालुका वाईज हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी 08.00 ते सायं. 06.00 वाजेपर्यत ई-पिक पाहणी संबंधित शंका व अडचणी असल्यास खालील क्रमांकावर विचारुन त्यांचे आपणास निरसन करता येणार आहे.

तालुका

हेल्पडेस्क क्रमांक

तालुका

हेल्पडेस्क क्रमांक

बीड

8805247773

पाटोदा

9834703973

धारुर

9890456062

आष्टी

9834703973

वडवणी

9890456062

परळी वै

9623004589

माजलगाव

9890456062

अंबाजोगाई

9096591991

शिरुर कासार

9763498955

केज

9096591991

गेवराई

9763498955

राज्यस्तरीय हेल्प डेस्क क्र. :- 02025712712

 

                  उपरोक्त ई-पिक पाहणी उपक्रमामध्ये समाजाच्या विविध घटकांनी भाग घ्यावाव्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्थालोकप्रतिनिधी यांनी ई-पिक पाहणी कामी योगदान दयावेअसे अवाहन करण्यात येत आहे.                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा