Subscribe Us

header ads

महिला कॅरम खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन शहर पातळीवरील स्पर्धेत खेळण्याची प्रथमच संधी !


बीड (प्रतिनिधी) - कॅरम खेळात बीड शहरच नाही तर जिल्हा पातळीवर सुद्धा फक्त पुरुष खेळाडूंच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या परंतु यावेळी प्रथमच महिला कॅरम खेळाडूंना सुद्धा व्यासपीठ मिळावे याकरिता बीड शहर पातळीवर स्पर्धेचे आयोजन केल्याने महिला कॅरम खेळाडूंना आपल्यातील खेळ व्यासपीठावर दाखविण्याची संधी प्रथमच मिळणार आहे.
याविषयी सविस्तर असे की, शहरातील धानोरा रोड वरील वरद प्राईड कॉम्प्लेक्स येथील युगसाक्षी कॅरम प्रशिक्षण क्लास अंतर्गत येत्या रविवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी महिला कॅरम खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेचा निकाल मंगळवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. ज्यात विजेत्यांना सहा प्रकारची बक्षिसे देण्यात येणार आहेत.  या स्पर्धेचे स्वरूप सिंगल व डबल असे दोन्ही प्रकारात असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिला खेळाडूंना त्यांच्यासोबत महिला खेळाडू पार्टनर असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेसाठी चा निर्णय हा अंपायर यांचा असणार असून तो अंतिम व सर्व मान्य राहील. या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिला खेळाडूंनी युग साक्षी कॅरम प्रशिक्षण क्लास, वरद प्राईड कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, बीड. येथे गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट ते रविवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष आम्रपाली गायकवाड यांच्याशी ७३८७०९९६४७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन युगसाक्षी कॅरम प्रशिक्षण क्लास तर्फे महिला कॅरम खेळाडूंना करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा