Subscribe Us

header ads

बीडचे भुमिपुत्र प्रा.शिवचरण गिरी यांना पीएच.डी.पदवी प्रदान

प्रतिनिधी | बीड औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील  मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक  व बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कारी  भूमिपुत्र प्रा. शिवचरण प्रभाकर गिरी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे प्रा.गिरी यांनी "विज्ञान कादंबरीतील विज्ञान आणि साहित्य : अनुबंध" या विषयावर प्रा.डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  आपले संशोधन कार्य पूर्ण केले. विज्ञान कादंबरी हा मराठीतील एक महत्वपूर्ण साहित्यप्रकार असून अशा विषयावरील संशोधन ही काळाची गरज आहे,त्यांचे हे संशोधन विद्यार्थी,अभ्यासक व वाचकांसाठी महत्वपूर्ण संदर्भ ठरणारे आहे. या संशोधन प्रबंधाचे त्यांनी लवकरच ग्रंथरुपात प्रकाशन करावे,ज्यामुळे मराठी विज्ञान सहित्याच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळु शकेल अशी अपेक्षा मराठी विज्ञानसाहित्य अभ्यासक , संशोधक विद्यार्थी  व मित्रांनी व्यक्त केली  आहे.   प्रा. गिरी यांना पीएचडी पदवी  मिळाल्याबद्दल   त्यांचे मराठी विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य ,डॉ.कैलाश आंभोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश भराड,डॉ.कमलेश महाजन डॉ.बालाजी जोकरे ,डॉ.अशोक गिरी,डॉ.विकास चौधरी,डॉ.माडजे,डॉ.जामकर,प्रा.वांकर,डॉ.पगारे ,डॉ.सावंत,प्रा.नरसिंग गवळी ,डॉ.उमेश मुंढे, महादेव गिरी,प्रसन्न म्हात्रे,  दिव्य मराठीचे बीडचे पत्रकार  दिनेश लिंबेकर,संतोष मनकुलवार,अमोल देशमुख,शिवहरी गिरी,कुलदीप पुरी,अनुरथ इंगोले,सुरेश मोरे,भिमाशंकर मोरे , बालाप्रसाद जाजु यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा