Subscribe Us

header ads

कुकडगाव, खंडोबा मंदिर शेजारी सिंदफना नदी पत्रातून रात्रंन दिवस अवैद्यरित्या वाळू उपसा चालुच.मंडळ अधिकारी आणी वाळू माफिया कनेक्शन काय आहे.? मंडळ अधिकारी वाळू माफिया वरती कारवाई का करत नाहीत


(बीड प्रतिनिधी) कुक्कडगाव, खुंड्रस, खन्डोबा मंदिर शेजारी, अनेक वेळा तक्रार देऊन ही मंडल अधिकारी ,तहसीलदार ,पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी, कोणतीही कारवाई करत नाहीत.अनेक वेळा मंडल अधिकारी तहसीलदार, तलाटी, हे वाळूच्या साठ्या जवळ जाऊन पाहणी करतात पण कोणतीही कारवाई न करता तडजोड करून हे अधिकारी माघारी जातात का काय अशी गावात लोक चर्चा करताना दिसत आहे.
आज ही शिंदफना नदी पात्रात वाळू उपसा केलेले साठे  दिसत आहे. आणि महसूल विभाग, तहसीलदार, मंडळ अधिकारी, यांना हे साठे कोणाचे आहेत हे माहीत आहे परंतु अद्यापही कुठलीही कारवाई का होत नाही,?  मंडळ अधिकारी पोलीस प्रशासनाची या वाळू उपसा करण्यावर खुप कृपा आहे असेच चित्र दिसत आहे. सर्व महसूल अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी, आणि पोलीस प्रशासन, हे  फक्त बघायची भूमिका घेत आहे. मग या वाळू माफियांच्या विरोधात कारवाई कोण करणार आहे.?? मंडल अधिकारी. तहसीलदार महसूल विभाग. पोलीस प्रशासन हे वाळू माफियांचा पाठराखण करण्यासाठीं आहे का.? या सर्व अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणाने  वाळू माफिया विना रॉयल्टी पावतीची बिनधास्तपणे वाळू उपसा करीत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी  अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.जनता आता लवकरात लवकर या सर्व अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरणार आहे अशी चर्चा या भागांतील नागरीक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा