Subscribe Us

header ads

कॅप्टन आठवले समता पुरस्कारांने सन्मानित

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे



बीड (प्रतिनिधी) दि. २४ आँगष्ट बुधवार - देशाच्या संरक्षणाकरिता २८ वर्षे सेवा केलेले, सेवा निवृत्तीनंतर देखील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समता सैनिक दलाची बांधणी व संघटनेच्या कार्याला वाहून घेतलेले कॅप्टन राजाभाऊ आठवले यांना  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष मा.एस.आर. भोसले यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल *छत्रपती राजर्षि शाहू महाराज*_'समता पुरस्कार'_ देऊन सन्मानित केले. याच कार्यक्रमाप्रसंगी संघटनेची बांधणी करण्याकरिता सतत प्रयत्न करणारे से.ब.अ-क.महासंघ बीडचे सचिव जी.एम. भोले सर, बीड ता.अध्यक्ष काशीनाथ वाघमारे, वडवणी ता.अध्यक्ष डी.एम. राऊत व बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण अहिरे, वैजनाथ पायके यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन यांनादेखील छत्रपती राजर्षि शाहू महाराज समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
       बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष एस. आर. भोसले व उपाध्यक्ष प्रा. कांबळे यांनी महासंघाच्या धानोरा रोड बीड येथील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन आढावा बैठक घेतली व संघटनेचे कार्य करीत असताना सेवारत व सेवानिवृत्त चे प्रश्न कसे सोडवावेत त्याबद्दल माहिती दिली आणि सेवा निवृत्तीनंतर देखील आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाज कार्य करण्यासाठी सतत तत्पर राहिले पाहिजे. बीड जिल्हा संघटनेचे अल्पावधीतील कार्य पुढे देखील संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण ताकतीने चालविले जाईल अशी अपेक्षा करून राज्य महासंघाचा भरघोस पाठींबा राहील असे स्पष्ट प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला सुधाकर विद्यागर, अरविंद डोळस, एम.एस.डोंगरे, दशरथ शिनगारे, बळीराम दळवी, एस.ए.सोनवणे, बी.एच.डोंगरे, शिवाजी मस्के, डाँ. किसनराव साळवे, दादाराव गायकवाड, शंकर वाव्हळकर, एँड. कल्यानराव गाडे, सुमनबाई गायकवाड,आशाताई विद्यागर, अनंत सरवदे (माझी तहसीलदार) बहुसंख्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन से.ब.अ-क. महासंघ बीडचे सचिव जी.एम.भोले यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन आठवले यांनी केले व संघटनेच्या कार्याच्या सद्यस्थितीतील अहवाल व पुढील कार्याची रुपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे तालुका उपाध्यक्ष एँड. चंद्रवदन जाधव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा