Subscribe Us

header ads

मुलगी झाली म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून केला खून!

शिरगाव-: मुलगी झाल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शिरगावात उघडकीस आली आहे. चांगुणा योगेश जाधव असं  २० वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आरोपी पतीचे योगेश कैलास जाधव असे नाव असून त्यांना एक मुलगी आहे. मुलगा का झाला नाही? यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांगुणा आणि योगेश याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. त्यांना मुलगी झाली. मात्र यावर योगेश नाराज होता. त्याला मुलगा हवा होता. यातूनच त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. मुलगी झाली आणि  मुलगा झाला नाही म्हणून योगेश भांडायचा. तसेच चांगुणाला मारहाण करायचा. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास चांगुणा कपडे धुत होती. तर, लहान मुलगी गाढ झोपेत असताना चांगुणा यांचा गळा पती योगेशने आवळत खून केला. संबंधित घटनेची कुणकुण शेजाऱ्यांना लागली त्यांनी तातडीने शिरगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी योगेश ताब्यात घेतला  असून खून केल्याची माहिती दिली आहे. घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा