Subscribe Us

header ads

कुक्कडगाव, खंडोबा मंदिर च्या शेजारी नदीपात्रातून खुलेआम होत आहे वाळू उपसा महसूल प्रशासन गप्प का ??????




(बीड प्रतिनिधी)-:  बीड तालुक्यातील पिंपळनेर  हद्दीतून सिंदफना नदीपात्रा च्या हद्दीतील आडगाव,कुक्कडगाव ,खुंड्रस,नाथापूर,या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून वाळू  तस्करांचा नंगानाच सुरू आहे. दिवस रात्र उपसा सुरू असून  या वाळू माफिया च्या डोक्यावर मंडळ अधिकारी महसूल प्रशासन तहसीलदार यांचे हात असल्याने वाळू माफिया बिनधास्तपणे अवैध वाळू उपसा करीत आहे. असे या गावातील लोक बोलून दाखवित आहे.कुणाच्या आशीर्वादाने हा वाळू उपसा सुरू आहे. याची चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालने अत्यंत गरजेचे आहे.  नदीपात्रात सध्या (144) कलम लागू असताना तरीसुद्धा या वाळू माफिया कुणाला न घाबरता बिनधास्तपणे छातीठोकपणे अवैध वाळू उपसा करीत आहे. महसूल प्रशासन तहसीलदार मंडळ अधिकारी ही फक्त बघायची भूमिका घेत आहे. या वाळू माफियांना कुणाचाच धाक राहिलेला नाही म्हणून हे वाळूमाफिया रात्रंदिवस नंगानाच करीत आहे.  कुक्कडगाव, खंडोबा मंदिर च्या शेजारी नदीपात्रातून खुलेआम उपसा होत आहे. तहसीलदार मंडळ अधिकारी यांना अनेक वेळा गावातील लोकांनी फोन करून सांगितलं तरी ती फक्त कारवाई करू असे आश्वासन देत आहे.ही खरोखर महसूल विभाग तहसीलदार मंडळ अधिकारी दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.याचे तहसीलदार मंडळ अधिकारी यांना काही घेना देना नाही या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेबांनी पुरस्कार देऊन सन्मानित करावा असे या गावातील लोक  बोलून दाखवत आहे.
कुकडगाव खंडोबा मंदिर शेजारील नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत दिवस-रात्र अवैधरित्या कलम (144)  नियमाचे उल्लंघन करून वाळूउपसा चालूच,पण कुठलाही अधिकारी कडक कारवाई करताना  दिसत नाहीत आणि ही कारवाई का केली जात नाही...? कुक्कडगाव खंडोबा मंदिर शेजारी.खुंड्रस . रामगाव  चव्हणवाडी येथील शिंदफणा  नदी पात्रातुन हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा केला जात आसतांना महसुलचे उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी हे कोणतीही कारवाई करत नाही फक्त बघायची भूमिका घेत आहे. प्रशासन फक्त सर्वसामान्य वरच कारवाई करणार का वाळू माफिया वर का कडक कारवाई करत नाही.मग या वाळु माफिया यांच्याविरोधात कार्यवाही कोण करणार अशी अनेक प्रश्न गावातील लोक बोलून दाखवित आहे.रोज हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा रात्र न दिवस करुन विना रॉयल्टी पावतीची अवैधरीत्या वाहतुक केली जात असतांना महसुल व पोलिस प्रशासन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गप्प का?? मा. सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा. राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी बीड यांनी याप्रकरणी लक्ष घालने अत्यंत गरजेचे आहे. आणि कोणी अर्थीक उलाढाल करत असेल तर त्यांची चौकशी करुन त्या अधिकाऱ्यांना निलंबीत केले पाहिजे अशी या गावातील लोक बोलीत आहे.
पिंपळनेर हद्दीतील या  वाळू तस्करांना जनता वैतागली असून अनेक वेळा निवेदन, आंदोलन करून सुद्धा काहीच फरक पडत नसून तहसीलदार, मंडळाधिकारी यांचे  वाळू तस्करांच्या डोक्यावर हात असल्याने  हे वाळू माफिया सर्वत्र नंगानाच करीत आहे. तरी नवीन आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून हा नंगानाच थांबावा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी या गावातील लोक करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा