Subscribe Us

header ads

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा- बीड नाट्यशास्त्र विभागातर्फे स्टॅन्ड अप कॉमेडी ऑनलाईन स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी


बीड (प्रतिनिधी ) येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड नाटयशास्त्र विभाग आणि फुल फिल्म इंटरटेन्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० वा. स्टॅन्डअप कॉमेडी स्पर्धा ऑनलाईन ठेवली आहे. असे नवगन शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी कळवले आहे.सो. के. एस. के.महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्या निमित्याने विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फुल फिल्म इंटरटेन्टमेंट या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ ऑगस्ट रोजी स्टॅन्ड अप कॉमेडीची अॉनलाईन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यासाठी देशभरातून ५५ स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून त्यातील १५ मराठी व १५ हिंदी स्पर्थकांना संधी मिळणार आहे. यातून दोन मराठी व दोन हिंदी स्पर्धकांना रोख पारितोषिक दिले जातील.ऑनलाईन होणाऱ्या या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून चल हवा येवू या मधील अभिनेते योगेश शिरसाठ, अंकूर वाढवे तर दिल दोस्ती दुनियादारी मधील अभिनेत्री पूजा ठोंबरे हे असणार आहे.प्रेक्षकांसाठी दोन दिवस आधी लिंक दिली जाणार आहे. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह व यु-टुबवर देखिल दाखवला जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर व फुल फिल्म इंटरटेन्टमेंटच्या संचालिका अंकुर तांगडे, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी कळवले आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे अवाहन उपप्राचार्य डॉ. ए. एस. हांगे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य एल.एन. सय्यद, पर्ववेक्षक जे. यु. कोळेकर, प्रा. दुष्यंता रामटेके यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा