Subscribe Us

header ads

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

 लखनऊ-: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज(शनिवार) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.
दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले होते. जेव्हापासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती.कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपाचे एक प्रमुख नेते होते.कल्याण सिंह यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नरोरो येथे गंगा नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, २३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल.” असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.  २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते. १९९९ मध्ये भाजपा सोडल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पुन्हा भाजपा प्रवेश केला होता. यानंतर ते बुलंदशहर येथून भाजपाचे खासदार बनले, त्यानंतर २००९ मध्ये अपक्ष खासदार देखील बनले होते. २०१० मध्ये कल्याण सिंह यांनी आपली स्वतंत्र जन क्रांती पार्टी तयार केली. उत्तर प्रदेशच्या अतरौली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा खासदार राहिलेले कल्याण सिंह यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा