Subscribe Us

header ads

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलावर अत्याचार

गेवराई-: सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 28 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील एकाने बलात्कार केल्याची घटना चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंगारवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व शिरूर कासार तालुक्यातील शिंगारवाडी येथील विवाहित महिलेस याच गावातील नाते संबंधातील आरोपी विठ्ठल काळे याने सोशल मिडीयावर फोटो अपलोड करण्याची धमकी  दिली. तसेच शेतामध्ये काम करत असताना जवळ कोणी नसल्याची संधी साधुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला .अशी फिर्याद पीडीत महिलेने चकलांबा पोलीसांत दिली आहे. याप्रकरणी आरोपी विठ्ठल काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस चकलांबा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक ए.डी. भोसले हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा